Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरगडहिंग्लजच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेविकेसह पोलिस अधिकारी ताब्यात ?

गडहिंग्लजच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेविकेसह पोलिस अधिकारी ताब्यात ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तिहेरी आत्महत्या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे उद्योजक संतोष शिंदे यांच्यासह पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन या तीरी आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेविका शुभदा पाटील (रा. गडहिंग्लज) पोलीस अधिकारी राहुल राऊत (रा. नीलजी), विशाल बाणेकर, संकेत पाटे (दोहेही रा. पुणे) या चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील संशयित माजी नगरसेविका शुभदा पाटील, राहुल राऊत यांना रविवारी कर्नाटकातून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तर विशाल बाणेकर, संकेत पाटे यांचा शोध मात्र अद्याप सुरू असल्याचे समजते. याच दरम्यान शहरातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर गडहिंग्लज बार असोसिएशनला निवेदन देत दोषी आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -