Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे ‘हे’ नेते अडचणीत, अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक हाजी हालीम खान, माजी नगरसेवक सदा परब, शाखाप्रमुख संतोष कदम आणि शाखाप्रमुख उदय दळवी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण झालेल्या पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर खार पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिवसेनाशाखा तोडल्याप्रकरणी ठाकरे गटाने एच पूर्व वॅार्ड ॲाफिसवर सोमवारी काढला मोर्चा होता. यावेळी वॅार्ड ॲाफिसरच्या कार्यालयात एका मुंबई महापालिका अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती.

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला होता. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.अनियमित, अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणी यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी महापालिकेच्या ऑफिसवर धडक दिली. यावेळी पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली होती.

उद्धव ठाकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’पासून काही अंतरावरच असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. वांद्रेतील शिवसेनेची ही 44 वर्ष जुनी शाखा होती. शिवसेनेचे कार्यालय जमीनदोस्त केल्याने ठाकरे गट संतप्त झाला आहे. शाखेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतानाही शाखेवर कारवाई केल्याने राग व्यक्त केला जात होता. याप्रकरणी निवदेन देण्यासाठी ठाकरे गट वॉर्ड ऑफिसला गेले होते. यासाठी ठाकरे गटाचं एक शिष्ठमंडळ वॉर्डात गेले यात अनिल परबही होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -