Sunday, August 10, 2025
Homeब्रेकिंगमुलीच्या कृत्याची आईला शिक्षा, जावयाने सरळ सासूलाच संपवले.. नेमकं काय झालं ?

मुलीच्या कृत्याची आईला शिक्षा, जावयाने सरळ सासूलाच संपवले.. नेमकं काय झालं ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नात्याला काळिमा फासणारी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका इसमाने त्याच्या सासूवर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने आपल्या वयोवृद्ध सासूवर सपासप वार केले आणि तिला तशाच जखमी अवस्थेत सोडून तो तेथून फरार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

विजयवाडा येथे शनिवारी हा खळबळजनक प्रकार घडला. जावयाने त्याच्या सासूवर धारदार शस्त्राने वार केले. सासू-सासरे आपल्या पत्नीला भडकावत असल्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयवाडा येथील वायएसआर कॉलनीमध्ये राहणाऱ्या गोगुला गुरूस्वामी आणि नागमणी यांना तीन मुली आहेत. त्यांची दुसरी मुलगी ललिता हिचे लग्न 15 वर्षांपूर्वी एकलव्य नगर येथील राजेशशी झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र आपसांतील वादामुळे ललिता ही पतीचे घर सोडून मुलांसह माहेरी येऊन रहात होती. काही दिवसांपूर्वीच ललिताने तिच्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.

घटस्फोटाची नोटीस मिळताच राजेश भडकला. सासरच्या लोक म्हणजेच ललिताचे आई-वडीलच तिला घटस्फोट घेण्यास उद्युक्त करत असल्याचा संशय त्याला आला. त्यानंतर त्याने सासू-सासऱ्यांना संपवण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी रात्री ललिताचे आई-वडील मोठ्या मुलीच्या घरी जात होते. हीच संधी साधून राजेशने धारदार कोयता घेऊन त्यांचा पाठलाग केला. चिट्टी नगर येथील फ्लायओव्हर जवळ त्याने त्या दोघांना रोखले आणि सासूवर निर्घृणपणे वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेली ती वृद्ध महिला तत्काळ खाली कोसळली. तर राजेशने सासऱ्यांवरही वार करण्याचा प्रयत्न केला मात्र ते निसटले. त्यानंतर राजेश तेथून फरार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ललिता यांची आई नागमणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास करत आहे. फरार आरोपी राजेशचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -