ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलंय. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा थरार सुरु होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच विश्वचषक वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता. त्यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याचं नाव घेत सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
टीम इंडियामधील प्रत्येकाने विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा, असं विधान सेहवागने केलं आहे. त्यामुळे आता विराट कोहली निवृत्ती घेणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. विराट कोहली हा महान खेळाडू आहे. विराट नेहमी इतर खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोन्ही खेळाडूंमध्ये खूप समानता आहे. मोठ्या सामन्यात विराट कोहली इतरांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे. त्यावेळी त्याने चार टीमची नावं घेतली, ज्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतात. भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सेमीफायनल गाठू शकतात, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.
वीरेंद्र सेहवागने यावेळी महेंद्रसिंह धोनीवर देखील भाष्य केलं. प्रत्येकजण अंधश्रद्धा पाळतो. धोनीची देखील त्याची एक वेगळी अंधश्रद्धा होती. माहीने पूर्ण वर्ल्ड कपमध्ये फक्त खिचडी खाल्ली होती, असं सेहवाग सांगतो. धोनीचं म्हणणं होतं की धावा निघत नसतील म्हणून काय झालं? टीम सामने जिंकत तर आहे ना! धोनीचं त्यामागील लॉजिक मला माहिती नाही, असंही सेहवाग म्हणाला आहे.
विराट कोहली निवृत्ती घेणार? वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -