ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे आणखी घडामोडी घडू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूरला विठ्ठल मंदिरात महापूजा संपन्न झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आज दुपारी सोलापूर दौऱ्यावरुन मुंबई विमानतळावर परतले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झालेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांची गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळावरुन परस्पर दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जावू शकतात, अशी माहिती मिळत आहे.
शिंदे-फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट, दोन्ही नेते दिल्लीला जाण्याच्या तयारीत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -