कोकण आणि घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गावा दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचलेला आहे. त्यामुळे हा महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून मुंबई व रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पालीपासून लांजा – दाभोळमार्गे कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात आली आहे.
तर कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा – लांजा – मार्गाने वळविण्यात आलेली आहे. कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे, यामुळे गुरुवारी रात्री १२.३० च्या दरम्यान राज्य महामार्गावरील नाणीज येथे रस्ता खचल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. याची माहिती प्रशासन अधिकाऱ्यांना मिळताच पर्यायी वाहतूक वळविण्यात आली
आहे.