Wednesday, November 29, 2023
Homeइचलकरंजीइचलकरंजीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक!

इचलकरंजीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक!

विवाहीतेस शिवीगाळ करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अनिल कासाप्पा कल्याणी (रा. विठ्ठलनगर शहापूर) याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार बुधवारी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पिडीत महिला एकटी घरात असताना अनिल हा घरात घुसला. त्याने पिडीतेला तिला शिवीगाळ करत अंगाशी लगट करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पिडीतेने आरडाओरडा केल्याने अनिलने तेथून पलायन केले. मात्र पुन्हा परत येऊन पिडीतेच्या आणि तिच्या दिराच्या घरावर दगडफेक केली. त्यामध्ये घराच्या काचा फुटून नुकसान झाले. तर दिराला जीवंत ठेवत नाही अशी धमकी देवुन पिडीतेच्या पतीच्या मोबाईलवर हातात तलवार घेतल्याचा फोटो पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोहेकॉ कोरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र