Thursday, October 3, 2024
Homenewsपत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तंत्रिकाकडे गेलेल्या पतीलाच गमवावा लागला जीव

पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तंत्रिकाकडे गेलेल्या पतीलाच गमवावा लागला जीव

एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय होता.यामुळे त्यानं एका तांत्रिकांची मदत घेतली. ज्यामुळे पत्नीच्या प्रियकराला आपल्या रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे. तांत्रिकाकडे येण्याच्या अगोदर नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यत्तीसोबत झाली होती. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत होता. यानंतर काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांच्यात मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रनं नीरजला सांगितले कि तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल. यासाठी शैलेंद्रन नीरजकडून 75 हजार रुपये घेतले होते.

मात्र, काही दिवसांनी नीरजनं शैलेंद्रला म्हटलं, की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. यानंतर शैलेंद्रनं नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रन आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. यानंतर पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणातील तिसरा आरोपी शामू अजूनही फरार आहे. 13 ऑगस्टला(august) फजलगंज येथून बेपत्ता झालेल्या नीरजचा मृतदेह 17 ऑगस्टला हमीरपुरच्या जंगलात आढळून आला होता. आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी तीन जिल्ह्यांचा उपयोग केला आणि घटनेला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कानपूरच्या फजलगंज येथून तांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्यानं नीरजला आपल्यासोबत नेलं आणि त्यानंतर हमीरपुरमध्ये त्याची हत्या केली. हि हत्या केल्यानंतर आरोपींनी नीरजची गाडी फतेहपूर जिल्ह्यात आणून जाळली. मात्र, कॉल डिटेलमुळे या सर्वाचा गुन्हा उघड झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -