Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरबाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली ही दीवार आहे, छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही'

बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली ही दीवार आहे, छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही’

कोल्हापूर : ‘ज्यांनी धोका दिला आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, यासाठी पक्ष तळागाळात पोहोचवा. पक्ष बांधणीचे काम मजबूत करा,’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (Arun Dudhwadkar) यांनी येथे केले.दरम्यान, मेळाव्यात सच्च्‍या आणि प्रामाणिक शिवसैनिकालाच उमेदवारी द्या, उसना उमेदवार नको, अशी ही मागणी सर्वांनीच भाषणात केली. याचवेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी थेट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली.

दुधवडकर म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली ही ‘दीवार’ आहे. छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही. लोकसभेसाठी उमेदवारी मागताना आपल्या पायाखाली किती थर मजबूत आहेत, हेसुद्धा पाहायला पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी पोहोचले पाहिजे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते ‘मातोश्री’च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. लोकसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी होण्यासारखी बांधणी करा.’

विजय देवणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी कधी खुर्चीसाठी राजकारण केले नाही. ज्यावेळी मी लोकसभा लढविली तेव्हा आपल्याकडे एकही आमदार नव्हता. फक्त संजय पवार बरोबर होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता उसना उमेदवार नको. एकेकाळी सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेचे होते. ते पुन्हा आणायचे आहेत. त्यासाठी लवकरच आम्ही राधानगरीपासून ‘मिशन २०२४’ हाती घेणार आहोत.’माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘मतदार संधीची वाट पाहत आहेत.

स्वाभिमानाने जनतेसमोर जायचे आहे. येणारा काळ अडचणीचा आहे; पण कठीण नाही. यासाठी सच्चा शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा अहवाल मातोश्रीवर पोहोचवावा.’माजी आमदार सत्यजित पाटील यांनी नेमका मेळावा कशासाठी आहे, हेच सांगण्यात आले नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लोकसभेसाठी जो उमेदवार द्याल, त्याला शाहूवाडी, आंबा परिसरातून मताधिक्य देऊ.’ माजी आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, ‘भाजप घराघरांत भांडणे लावत आहे. सुरुवातीला शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली.

भाजपची ही रणनीती मतदारांसमोर आणली पाहिजे.’मुरलीधर जाधव म्हणाले, ‘काहीजण निवडणुकीवेळी पक्षात येऊन खासदार झाले. आता हे चालणार नाही. आता उसना उमेदवार खपवून घेणार नाही.’ यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सांगलीचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नियाज खान, विशाल देवकुळे, मंजित माने, हर्षल सुर्वे, दीप्ती कोळेकर, स्मिता सावंत, प्रकाश पाटील, सुप्रिया पाटील, अवधूत साळोखे, प्रभाकर खांडेकर, विराज पाटील, तानाजी आंग्रे, दीपाली शिंदे, दीपक गौड आदी उपस्थित होते.पक्षांतर केलेल्यांचा समाचार‘ज्यांना खुर्चीला खुर्ची लावून बसविले त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

ही शिवसेना ठाकरेंची आहे. कुठेही कमी पडणार नाही. खुर्चीला खुर्ची लावून बसणारे बाहेर पडले असले तरी समोर बसणारे मतदार आपल्याला निवडून दिलेलेच आहेत, हे विसरून चालणार नाही’, अशा शब्दांत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी शिवसेनेतून पक्षांतर केलेल्यांचा समाचार घेतला.राजघराण्याचा आदर करावा…शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्यावर टीका केली. त्यावर दुधवडकर यांनी राजघराणे हे राजर्षी शाहू छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो आणि इतरांनीही आदर करावा, असे सुनावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -