कोल्हापूर : जिल्ह्याच्या (Kolhapur) ग्रामीण भागात पावसाचा (Rain) जोर वाढला असून, राधानगरी धरण क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला.राधानगरीच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढधरणक्षेत्रासह (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ८८ तर दाजीपुरात १२४ मिलिमीटर पाऊस झाला. आठवडाभरातील पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट इतकी होती.
ती आज ३६० फुटापर्यंत पोहोचली आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ तासांत ६७ तर तुळशीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.दरम्यान, आज दुपारपासून राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी ७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संततधार पावसाने पाणीसाठ्यात होणारी वाढ नियंत्रित राखण्यासाठी बीओटी तत्त्वावरील वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र धरण पायथ्याशी असलेल्या आणि बंद करण्यात आलेल्या जुन्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला महाजेनकोकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात या केंद्रातून पूर्ववत वीज निर्मिती सुरू करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच जनित्र संचाची विशेष देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाल्यानंत, जलसंपदाकडून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. तरीही महाजनकोकडून काहीच हालचाली झालेल्या नाहीत. शिरगाव परिसरात शेतीकामांना गती शिरगाव : गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे.
शेतीच्या खोळंबलेल्या कामांना आता गती आली आहे. भात रोपलावणीची काम अर्धवट राहिली होती. रोपलावणीसाठी चिखल गुट्टा करण्यासाठी पावसाचेच पाणी लागते, पण पावसाअभावी ही कामे खोळंबली होती. शिवारात आता पाणीच पाणी झाल्याने रोपलागणीच्या कामांना गती आली आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरधामोड : सकाळपासून येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासात २९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे . केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे .
आंबा, विशाळगड परिसरात संततधारआंबा ः तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, विशाळगड व दक्षिणेकडील येळवण जुगाई परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे भात रोपलावणीची धांदल उडाली आहे. संततधारेमुळे कडवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कडवी मध्यम प्रकल्पासह मानोली व कासार्डे येथील लघुपाटबंधारे तलावात पाणी पातळी वाढली आहे. आंबा घाटात पाऊस आणि धुके आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या भात रोप लावणीसाठी परळे निनाई, वाकोली, चांदोली, केर्ले, वारूळ, गजापूर भागात एकच धांदल उडाली आहे.बोरपाडळे परिसरात रिपरिप बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, माले , मिठारवाडी, आंबवडे, काखे, मोहरे आदी परिसरामध्ये गेले दोन दिवस आणि काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.