Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीआधी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातोय; अजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची...

आधी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातोय; अजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची टीका

गेल्यावर्षी शिवसेनेत (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवत वेगळा गट तयार केला. या घटनेला एक वर्षे पूर्ण होत नाही तो अशीच बंडखोरी राष्ट्रवादीत (NCP) पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. आधी पक्षातील लोकं फुटायचे आता पक्ष पळवला जातोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यवतमाळ येथे माध्यमांशी ते संवाद साधत असून, यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -