Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरमोदी सरकारच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसचे निदर्शने!

मोदी सरकारच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसचे निदर्शने!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल मोदी सरकारच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसने निदर्शने केली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परवेशद्वारासमोर आंदोलन केले. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी आंदोलन झाले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनामध्ये काँग्रेसचे बाजीराव खाडे, गोकुळचे संचालक बाजीराव खाडे, अंजना रेडेकर, महिला आघाडीच्या सरला पाटील, बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, हिंदुराव चौगुले, शंकराव पाटील, भगवान जाधव, जयसिंगराव हिरडेकर, शिवाजीराव कांबळे, प्रशांत देसाई, यशवंत थोरवत, बाजार समिती सभापती भारत पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती करवीर तालुकाध्यक्ष संदीप पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अर्जुन माने, सुभाष बुचडे, राजाराम गायकवाड, इंद्रजीत बोंद्रे ईश्वर परमार, दुर्वास कदम, लीला तौफिक मुलानी, संजय पोवार वाईकर, शशिकांत खवरे, रंगराव देवणे, बाजीराव सातपुते, संपतराव चव्हाण पाटील, सुयोग वाडकर, दीपक थोरात, उदय पोवार, अक्षय शेळके, सुयोग मगदूम, अनुप पाटील अमर जरग, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे आदींचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -