नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महानगरपालिकेत विविध पक्षातील कारभाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. नेत्यांची वाढलेली वर्दळ मात्र अधिकारी, मक्तेदारांची डोकेदुखी ठरत आहे. आयुक्तांनी यावर आतापासूनच लक्ष ठेवून कारभाऱ्यांचा महापालिकेतील हस्तक्षेप थांबवणे आवश्यक आहे. असे जाणकारातून बोलले जात आहे.
इचलकरंजी महापालिकेतील कारभाऱ्यांचा हस्तक्षेप नवा नाही. नगरपालिकेत याची वारंवार चर्चा होत होती. त्याचे कारभाऱ्यांना काहीही वाटत नाही. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अगदी पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत या कारभारी व्यक्तींनी मजल मारली आहे. कारभाऱ्यांची ही टोळी कोणताही नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना घेरण्यात माहीर आहे. अधिकाऱ्याला विविध
टक्केवारीसाठी कारभाऱ्यांची बैठक महानगरपालिकेत गेल्या दिड वर्षापासून प्रशासकीय राज्य सुरू आहे. त्यामुळे अनेक कारभारी बिथरले आहेत. त्यांच्या हाती काहीच मलिदा लागत नसल्याने ती मंडळी मक्तेदारांची बैठक घेऊन काम देण्याचे आमिष दाखविण्याबरोबरच टक्केवारीची मागणी करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा कारभाऱ्यांवर वेळीच जरब बसविणे गरजेचे आहे.
प्रकारची अमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढताना कारभारी दिसतात. मात्र याला.अपवाद महानगरपालिकेचे आयुक्त/ सुधाकर देशमुख होते. आयुक्तांची मर्जी संपादन करून आपल्या ओळखीच्या आणि जवळच्या व्यक्तीला टेंडर देण्यासाठी शब्द टाकला जातो. त्या व्यक्तीचे अगदी बिल काढण्यापर्यंत हे नेते मदत करताना दिसतात. त्यासाठी आयुक्तांना घेरले जाते. मात्र आपण यांच्या जाळ्यात कधी आडकलो आयुक्त आणि अधिकारी यांना कळतच नाही. मात्र या कारभारी लोकांच्या दबावाला बळी न पडता एक शिस्तबध्द व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुधाकर देशमुख यांनी आपली कारकिर्द गाजविली. त्यांनी प्रशासनाला लावलेली शिस्त कायम रहाणार का? असे बोलले जात आहे. आता नूतन आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे हे हजर झाले आहेत.
राज्यातील अनेक महानगरपालिकेत लोकनियुक्त सभागृह नाही. निवडणूक न झाल्याने सर्व अधिकार प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे आहेत. त्यामुळे कारभारी लोकांना काय करता येईनासे झाले आहे. आता नवीन आयुक्त आल्यानंतर कारभाऱ्यांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. प्रत्येक खात्यात जाऊन कोणते टेंडर निघाले आहे? कोण टेंडर कर्मचाऱ्यांची कारभाऱ्यांना फूस भरले आहे? याची चाचणी करून माहिती घेऊन पुन्हा कारभारी आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुन्हा महानगरपालिकेत भ्रष्टाचाराला आणि गैरशिस्त उचल घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुक्त देशमुख यांनी लावलेली शिस्त बिघडण्याची शक्यता असल्याने, पुन्हा येरे माझ्या मागल्या होण्याची शक्यता आहे. कारभाऱ्यांचा वावर बाढल्याने मक्तेदार खाते प्रमुख, बुचकळ्यात पडले असून त्यांच्यात अस्वस्थता आहे. कारभारी व्यक्तींच्या हस्तक्षेपाला मोकळी वाट करून न देता – त्याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. तरच आयुक्तांना आपला कार्यकाळ पूर्ण करता येईल. अन्यथा जर कारभारी शिरजोर झाले आणि डोक्यावर बसले तर त्यांना आवरणे कठीण जाईल.
महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी नेहमी नेत्यांच्या संपर्कात असतात. महापालिकेतील सर्व घडामोडी प्रथम अधिकाऱ्यांना न सांगता नेत्यांना सांगतात. काही नेत्यांना हे कर्मचारीच फूस लावताना दिसतात. नेल्यावर जीव असलेल्या आणि कारभाऱ्यांना सर्व माहिती पुरविणाऱ्या या कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर आयुक्तांनी लक्ष ठेवले पाहिजे. अशा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजेत. जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.