Saturday, March 15, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगेच्या पाणी पातळीत घट राजापूर बंधारा वाहतुकीसाठी  खुला!

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट राजापूर बंधारा वाहतुकीसाठी  खुला!

गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मंगळवारी सायंकाळ अखेर ६ इंचाने पाणी पातळी कमी झाल्याने महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारा राजापूर बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

तर तेरवाड बंधारा बुधवारी सकाळपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाने दडी मारल्याने पुन्हा बंधाऱ्याला बरगे घालण्याची वेळ पाटबंधारे विभागाला येणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.


यंदा मान्सून उशिराने दाखल झाले. त्यातच म्हणावा तितका पाऊस पडत नसल्याने नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत होती. गेल्या चार ते पाच दिवसात धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. शिरोळ तालुक्यातील शिरोळ, तेरवाड आणि राजापूर ही तिन्ही बंधारे पाण्याखाली गेली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत ६ इंचाने पाणी पातळीत घट झाल्याने राजापूर बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

तसेच तेरवाड बंधारा बुधवारी सकाळपर्यंत खुला होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे.
दरम्यान या आठवड्यात पाऊस झाला नाही तर पुन्हा शिरोळ, तेरवाड आणि राजापूर या तिन्ही बंधाऱ्यांना बर्गे घालण्याची गरज निर्माण होणार आहे. यावर्षी पावसाने गडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -