देशातील राजकीय पक्षाची मोट बांधण्यासाठी जे बैठका घेत आहेत, त्यांचीच बोट फुटली आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला. २०१९ ला कोणतीही बेइमानी झाली नसताना तुम्ही मात्र झूटनीतीचा वापर केला. देवेंद्र फडणवीस हा माणूस निष्कलंक आहे. खरे तर तुम्ही कलंकित आहात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मी घरात बसणारा मुख्यमंत्री नसून रस्त्यावर उतरून काम करणारा आहे. इचलकरंजीला जाणाऱ्या १० किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून, राज्य सरकारच्या वाट्याला येणारा निधी देण्याचे आश्वासनही यावेळी दिले.
कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत
शिंदे, उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे निष्कलंक आहेत खरेतर तुम्ही कलंकित आहात. इतक्या वर्षाच्या युतीला कलंकित करण्याचे काम तुम्ही केला, अशी जोरदार टीका करत २०१९ साली कोणतीही बेइमानी झालेली नसताना तुम्ही झूटनीतीचा अवलंब केला, असा गंभीर आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला. सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधीही तडजोड केली जाणार नाही. मी बोलयाच टाळतो, मला बोलायला लावू नका, असा इशारा दिला.
डबल इंजिनचे सरकार ज्या वेगाने काम करू लागले. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, म्हणून ते वज्रमुठ सभा घेऊ लागले. विरोधकांची जे मोट बांधत होते. त्यांचीच बोट फुटली. त्यामुळे आता मोट कुठून बांधणार. विरोधक एकत्र येऊन सुद्धा एका नेत्याचे नाव ते ठरवू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. २०१४ साली शिवसेना- भारतीय जनता पार्टीची युती होऊ शकली नाही. तेव्हा भाजपाचे मत होते कि, आपण सरकार बनवूया तेव्हा आमच्या नेत्यांना विश्वास नव्हता. तेव्हा विरोधी पक्षनेता झालो. भाजपाने प्रत्येकवेळी युतीसाठी अनुकूल भूमिका घेतली. युती तुटू नये यासाठी दोन पावले मागे जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी भाजपाचा महापौर बसवण्याची तयार पूर्ण झाली होती. तेव्हा आमच्या नेत्याचा जीव मुंबई महानगरपालिकेत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीसानी मुंबई महापौर शिवसेनेचा केला. २०१९ मध्ये युतीची चर्चा करण्यासाठी फोन केले. मात्र एकही फोन घेतला नाही. भाजपा २०१८ साली शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार झाले होते. उपमुख्यमंत्रीपद घेतेले तर एकनाथ शिंदे द्याव लागेल म्हणून ते नाकारले, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.
संघटन, पक्ष, शाखा, मजबूत करण्यावर भर द्या. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचावा, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करा. लोकांना विश्वास वाटेल कि सरकार माझ आहे. असे वातावरण निर्माण करा. असा संदेश त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.