येथील कापड दुकानाच्या पहिल्या वर्धापना निमित्त विनापरवाना रस्त्यावरच साऊंड सिस्टिम लावून आरडाओरडा करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दुकान मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शाह कॉर्नर किरकोळ कारणातून परिसरातील गाळ्यात सुभाष घट्टे यांचे श्रीमंत मेन्स वेअर नामक दुकान आहे. या दुकानाच्या पहिल्या वर्धापना निमित्त १२ जुलै रोजी रात्री रस्त्यावरच साऊंड सिस्टिम आणि लाईट इफेक्टची कमान उभी करण्यात आली होती. तसेच आरडाओरडा करत वाहतुकीलाही अडथळा केला जात होता. कार्यक्रमासाठी ४० ते ५० लोकांचा जमाव जमवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन होत होते. त्यामुळे गावभाग पोलिस ठाण्यात दुकान मालक सुमित सुभाष घट्टे (वय २२), सिस्टिम लावणारे राज इंगळे या
दिपक सुरेश घट्टे आणि साऊंड गोकुळ चौकातील तिघांच्या
विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.