Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरजिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी! Kolhapur news

जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी! Kolhapur news

गेल्या ४-५ दिवसानंतर शुक्रवारी पुन्हा मान्सूनचा पाऊस बरसु लागल्याने शेतीच्या कामांना गती येईल. कोल्हापूर शहरातही दमदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते, पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६६.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून उर्वरित तालुक्यात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे, गगनबावडा तालुक्यात ६६.६ मिमी, हातकणंगले – ७.७ मिमी, शिरोळ – ३ मिमी, पन्हाळा- ८.३ मिमी, शाहूवाडी – २१.९ मिमी,
राधानगरी- १४.७ मिमी, करवीर- ७.५ मिमी, कागल- ९.८ मिमी, गडहिंग्लज- १३.९ मिमी, भुदरगड – ३३.१ मिमी, आजरा- १३.५ मिमी, चंदगड- १५.७ मिमी पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे ९ बंधारे पाण्याखाली गेले होते, मात्र गेल्या ४-५ दिवसात पावसाने दडी मारल्याने इचलकरंजी बंधारा वगळता सर्व बधाऱ्यांवरील पाणी उतरले असून नद्याचे पाणी आता पात्रात गेले आहे. जिल्हयातील बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १२ फूट, सुर्वे १६ . २ फूट, रुई ४०.६ फूट, इचलकरंजी ३७.६ फूट, तेरवाड ३७.६ फूट, शिरोळ २८.३ फूट, नृसिंहवाडी २२.६ फूट अशी आहे.

जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठ्यातही अल्पशी वाढ होत असून राधानगरी धरणामध्ये गुरुवारी ३.८१ टीएमसी तर काळम्मावाडी धरणात ४.६९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. तुळशी ०.९८ टीएमसी, वारणा १४.६९ टीएमसी, कासारी १.१४ टीएमसी, कडवी १.०९ टीएमसी, कुंभी १.३९ टीएमसी, पाटगाव १.४१ टीएमसी,, चिकोत्रा ०.४६ टीएमसी, चित्री ०.४४ टीएमसी, जंगमहट्टी ०.३६ टीएमसी, घटप्रभा टीएमसी, जांबरे ०.५३ टीएमसी, आंबे आहोळ ०.४१ टीएमसी इतका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -