Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेUorfi Javed आता हेच सोने म्हणत उर्फी जावेद हिने टोमॅटोपासून तयार केले...

Uorfi Javed आता हेच सोने म्हणत उर्फी जावेद हिने टोमॅटोपासून तयार केले चक्क ‘हे’


उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. अनेकदा थेट कपड्यांमुळेच उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या थेट धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, याचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा नेम देखील नाही. नेहमीच मोठ्या वादामध्ये (Dispute) उर्फी जावेद ही आपल्या कपड्यांमुळे अडकते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना उर्फी जावेद हिने सांगितले की, मला कधी कधी माझ्या स्वत:चा खूप जास्त राग येतो. नक्कीच मी तरूणांसमोर एक चांगले उदाहरण (Example) नाहीये. मात्र, काही गोष्टी आता माझ्याही हातामध्ये नाहीत.

कारण मी आता परत यायचे ठरवले तरीही ते अजिबातच शक्य होणार नाहीये. कारण माझे फोटो आणि व्हिडीओ हे कायमच सोशल मीडियावर राहणार आहेत. पुढे उर्फी जावेद म्हणाली की, मला हे देखील माहिती आहे की, मला कोणतेच कुटुंबिय हे स्वीकारणार नाही. मला काही गोष्टींचे फार जास्त वाईट वाटते. मात्र, आता वेळ निघून गेलीये.

आता नुकताच शेअर केलेल्या फोटोंमुळे उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. उर्फी जावेद हिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक अत्यंत खास गोष्ट आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये चक्क टोमॅटो दिसत आहे. या फोटोंसोबतच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

या फोटोमध्ये चक्क ईअररिंग्स म्हणून उर्फी जावेद हिने टोमॅटो घातल्याचे दिसत आहेत. इतकेच नाही तर आता हेच सोने असल्याचे देखील उर्फी जावेद हिने म्हटले आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण उर्फी जावेद हिच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये टोमॅटोचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुनील शेट्टी हा म्हणाला होता की, एक अभिनेता असल्याने टोमॅटोच्या वाढलेल्या भावाचा मला काहीच फरक पडत नाही, असे अजिबात नाहीये, मलाही फरक हा पडतो. आमच्या किचनमध्ये आम्ही टोमॅटो कमी वापरण्यास सुरूवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -