महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत सरकार सतत मदत करत असते. सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात ज्याचा महिलांना आणि खासकरून ग्रामीण भागातील जनतेला फायदा व्हावा. परंतु कुटुंबाचा नकार किंवा आर्थिक गोष्टींमुळे बऱ्याच महिलांना नोकरी करून पैसे कमवता येत नाही. महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारत सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. फ्री शिलाई मशीन योजना असं या योजनेचे नाव असून या माध्यमातून भारत सरकारकडून गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन दिल्या जात आहेत. सरकारकडून मिळालेल्या या मोफत शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात.
कष्टकरी महिलांना काम मिळावं आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून त्या घरी राहून शिवणकाम करून चांगल्या प्रमाणात पैसे कमवू शकतील यासाठी सरकारने मोफत शिलाई मशीन योजना आणली आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून देशातील ५०००० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया देण्यात आली आहे.मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त गरीब आणि आर्थिकदृष्टया दुर्बल महिलाच अर्ज करू शकतात.
अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे
सध्या गुजरात, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, बिहार या राज्यात ही योजना सुरु आहे.
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर असा करा अर्ज
1) मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.india.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या
2) त्यानंतर मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज डाऊनलोड करा.
3) अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल.
4) त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व इन्फॉर्मेशन भरा.
5) फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडा.
6) आणि संबंधित विभागाकडे कागदपत्रासहित फॉर्म सबमिट करा.
7) यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
8) यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केल्या जाईल. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळेल.