Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगलीत लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी मायणी येथील युवकासह त्याला साथ देणाऱ्या तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक बाळासो थोरात, वंदना थोरात, विकी पवार आणि दिपक कणसे यांचा समावेश आहे.घटनेची माहिती अशी, पीडिता एका कंपनीत काम करते. काही वर्षापूर्वी संशयित प्रतिक थोरात याच्याशी तिची ओळख झाली. प्रतिकसह अन्य तिघांनी पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

हा प्रकार दि. १६ एप्रिल २०२१ ते दि. १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला. मध्यंतरी खानापूर तालुक्यातील माहुली येथे संशयितांनी पीडितेस लग्नाची बोलणी करण्याकरिता बोलवले. तेथे पीडितेस धक्काबुक्की करुन लग्न लावून देणे जमणार नसल्याचे सांगून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -