Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंगअक्षय काही थांबेना! OMG 2 नंतर 'वेलकम 3' ची घोषणा, रिलीज डेट...

अक्षय काही थांबेना! OMG 2 नंतर ‘वेलकम 3’ ची घोषणा, रिलीज डेट आली समोर!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती राहिली आहे. त्यात खिलाडीच्या वेलकम चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. हेरा फेरी सारखं यश या चित्रपटाला मिळाले होते. नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते या चित्रपटामद्ये होते. नाना पाटेकर यांनी त्या चित्रपटात साकारलेली ती विनोदी भूमिका प्रचंड गाजली. सोशल मीडियावर तर त्याचे अजूनही कौतूक होते. त्याचे मीम्स तर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. त्यात नानांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले होते. नानांनी उदयसेठची भूमिका साकारली होती. तर अनिल कपूरनं मजनू भाईची साकारलेली भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. वेलकम नंतर त्याच्या दुसऱ्या भागानं मात्र प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यात जॉन अब्राहम आणि श्रृती हसन यांच्या भूमिका होत्या. आता निर्मात्यांनी वेलकम ३ ची घोषणा केली आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. २०२४ च्या नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या भागामध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या भूमिका असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -