ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय बाजारपेठेत एकामागोमाग एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत. याचदरम्यान आता जर्मनीमधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी ऑडीने आपल्या कार कलेक्शनमध्ये आता इलेक्ट्रिक कार जोडली आहे. ऑडीने नुकतीच आपली इलेक्ट्रिक कार Audi Q8 e-tron ला भारतीय बाजारपेठेत आणलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरीमुळे ही कार ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे. ऑडीने या कारचं स्पोर्टबॅक व्हर्जनही लाँच केलं आहे. एकूण 4 व्हेरियंटमध्ये असणाऱ्या या कारच्या बेस मॉडेलची किंमत 1.14 कोटी पासून सुरु होत आहे. कंपनीने या कारच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे. ग्राहक 5 लाख रुपयांची टोकन अमाऊंट देत कार बूक करु शकतात.
Audi Q8 e-tron दोन वेगवेगळ्या बॉडी टाइपमध्ये सादर करण्यात आली आहे. यामधील एक एसयुव्ही व्हर्जन असून, दुसरी स्पोर्टबॅक आहे. ही कार एकूण 9 एक्स्टिरियर आणि 3 इंटिरियर शेड्समध्ये उपलब्ध असेल. बाहेरच्या रंगात मडेरा ब्राऊन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मिथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यांचा पर्याय आहे.तर दुसरीकडे, इंटिरियर थीममध्ये ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक यांचा समावेश आहे.
31 मिनिटांमध्ये फुल चार्ज! 600 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच, किंमत वाचून हादरा बसेल
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -







