Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगअखेर चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची 'वेळ' ठरली ! ISRO ने दिली माहिती

अखेर चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची ‘वेळ’ ठरली ! ISRO ने दिली माहिती

भारताची चांद्रयान मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून आज अधिकृतरित्या चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरणार आहे.या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडेलवरून दिली आहे.

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. हे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर उतरताना देशासह परदेशी नागरिकांनाही पाहता येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे लँडिंग संस्थेच्या अधिकृत वेबसाइट, सोशल मीडिया हँडल, यूट्यूब आणि टेलिव्हिजनवर थेट प्रसारित केले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -