Wednesday, July 30, 2025
Homeइचलकरंजीबंद घराला शॉर्टसर्किटने आग : सुमारे ५ लाखांचे नुकसान

बंद घराला शॉर्टसर्किटने आग : सुमारे ५ लाखांचे नुकसान

कुलूपबंद घरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना आज गुरूवारी सायंकाळी निपाणी येथील जत्राट परिसरात घडली. या घटनेवेळी घरात कोणीच नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक क माहिती अशी की जत्राटबेस येथील रहिवाशी गणेश लहू पोळ यांच्या नातेवाईकांचा निपाणी येथील वाल्मिकी भवनात आज गुरुवारी सायंकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गणेश पोळ आपल्या सर्व कुटुंबीयांसह कार्यक्रमास गेले होते.मात्र कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच त्यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली.

या घटनेत सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी आणलेले अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली. या घटनेची नोंद निपाणी अग्नीशामक दलात झाली आहे.

सर्वसामान्य कुटूंब उघड्यावर गणेश पोळ यांचे सर्वसामान्य कुटुंबीय असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे घरातील सर्व साहीत्य जळाल्याने यांचे टुंबीय उघड्यावर पडले आहे. जळालेल्या साहीत्याकडे पाहून घटनास्थळी पोळ यांच्या कुटूंबातील महिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. महिला ढसाढसा रडत होत्या. त्यामुळे या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -