Wednesday, July 30, 2025
Homeइचलकरंजीधर्मनगर इचलकरंजी फाट्यावर तृतीयपंथीचा दगडाने ठेचून निर्घृण खून

धर्मनगर इचलकरंजी फाट्यावर तृतीयपंथीचा दगडाने ठेचून निर्घृण खून

चिपरी (ता. शिरोळ) येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील
मयत – संतोष जावीर शोध पोलीस घेत आहेत.
इचलकरंजी फाट्याजवळ गुरुवारी रात्री तृतीयपंथी संतोष रामदास जावीर (वय ३४, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी घटना उघडकीस आली. तृतीयपंथीयाच्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष रामदास जावीर हे तृतीयपंथी असून ते गुरुवारी रात्री इचलकरंजी फाट्याजवळ थांबले होते. तर गुरुवारी रात्रीच्या सुमारात संतोष जावीर यांच्या डोक्यात अज्ञातांनी दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर ही माहिती जयसिंगपूर ठाण्याला कळविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली. अज्ञाताने संतोष यांच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने माहिती घेण्यास सुरुवात केली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

मात्र, जादा तपासण्या आवश्यक असल्याने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती. या खूनाच्या घटनेनंतर तृतीयपंथांनी गर्दी केली होती. याबाबत डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके म्हणाल्या, गुरुवारी रात्री संतोष जावीर यांचा दगडने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा खून कशासाठी व कोणत्या कारणातून झाला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -