इचलकरंजी, शहरातील प्रमुख मोठ्या वर्दळीचा असलेला महासत्ता चौक गेल्या कित्येक वर्षापासून रूं दीकरणापासून लालफितीमध्ये अडकला आहे. रूंदीकरणाचे काम रखडल्यामुळे चौक कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा अड्डाच बनला आहे. या ‘ चौकातून जाताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. महानगरपालिका प्रशासन एखादी दुर्घटना घडण्याच्या प्रतिक्षेत आहे की काय ? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या चौकाचे तातडीने रूंदीकरण न केल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सांगली, मिरज, जयसिंगपूर या महत्त्वाच्या शहराला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सांगली रोडची ओळख आहे. या
राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष गेल्या काही वर्षापासून महासत्ता चौक रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही वर्षापूर्वी काही राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घेऊन चौकाच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नाला यश मिळाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
रस्त्यावरील केंद्रबिंदू म्हणजे महासत्ता चौक आहे. या रस्त्यावर अनेक लहान-मोठे विद्यालये, कॉलेज, तसेच उद्योग व्यवसायांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर सकाळच्या सुमारास व शाळा, कॉलेज, महाविद्यालये सुटण्याच्या सुमारास मोठी गर्दी होते. त्यामुळे महासत्ता चौक परिसरात वाहतुक कोंडी नित्याचीच बनली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन असताना महासत्ता चौक परिसराचे रूंदीकरणाचे काम हाती घेतले होते. त्याला राजकीय पाठबळही मिळाले होते. चौकामध्ये अडथळा ठरणारे श्री हनुमानाचे मंदीर सुमारे तीन ते चार वर्षापूर्वी स्थलांतरीत करण्यात आले.
तसेच चौकाच्या रुंदीकरणाबाबत अनेकवेळा सर्व्हेही करण्यात आला होता. नेमके कोठे माशी शिंकली’ आणि काम रखडले आहे. या रुंदीकरणाकडे राजकीय मंडळींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसून येत आहे. या दुर्लक्षपणामुळे महासत्ता चौक हा वाहतुक कोंडीचा चौक बनला आहे. या चौकामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाहतुक पोलिस नेमले जातात. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या वाहतुक कोंडीमध्ये एखादी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
परिसरातील नागरिक सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीला वैतागले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने चौक रूंदीकरणाबाबत निर्णय घेऊन चौकाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजीतील महासत्ता चौक बनले वाहतुक कोंडीचे धोकादायक ठिकाण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -