Sunday, September 24, 2023
Homeसांगलीसांगली: अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या मित्राचा दारूत तणनाशक मिसळून खून, आरोपीला जन्मठेपेची...

सांगली: अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या मित्राचा दारूत तणनाशक मिसळून खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणार्‍या मित्राचा दारूमधून तणनाशक मिसळून खून केल्या प्रकरणी एका आरोपीस दोषी ठरवून अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलीसंशयित महिलेची मात्र पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, लहू लक्ष्मण कांबळे (वय ४१ रा. हणमंतवाडिये ता. कडेगाव) यांने मित्र सचिनकुमार कांबळे याचा २० मे २०२० रोजी तणनाशक मिसळून दारू पाजून खून केला होता. दारू पाजल्यानंतर त्याच्या नाकातोंडावर ठोसे मारून व गळा आवळून खून केला होता. हा प्रकार केल्यानंतर तो स्वत: तासगाव पोलीस ठाण्यात हजर झाला होता.आरोपी लहू कांबळे याचे मृत सचिनकुमार कांबळे याची पत्नी प्रज्वला हिच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधावरून पतीकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी दोघांनी मिळून खूनाचा कट रचला होता. या प्रकरणी तासगाव पोलीसांनी तपास करून दोघाविरूध्द सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात २० साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.वाय. गौड यांनी आरोपी लहू कांबळे याला दोषी ठरवून जन्मठेप व ४ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर महिलेला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र