जत- शेगाव रोडवर जतपासुन जवळ माने वस्ती येथे भिमु पांडुरंग माने (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर) याने दारूच्या नशेत चिठ्ठी लिहून नातेवाईकांना सोशल मीडियाव्दारे पाठवून घरासमोरील झाडास गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
जत -शेगाव रस्त्यावर रेवनाळ गावाच्या अलीकडे जत हद्दीत माने वस्ती आहे. भीमू पांडूरंग माने अविवाहित असून चालक म्हणून काम करतो. काल रात्रीच त्याने मी जीवनाला कंटाळलो आहे. याबाबत माझ्या आई – वडिलांना पोलिसांनी त्रास देऊ नये, असे चिठ्ठीत लिहले होते. ते त्याने नातेवाईकांनाही पाठविले. नातेवाईकांनी त्याच्या भावास व आई, वडील यांना याची माहिती दिली. अन् आज पहाटेच्या सुमारास घरासमोरील झाडास भिमुचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला. जत पोलिस ठाण्यात याबाबत त्याचा भाऊ श्याम माने यांनी फिर्याद दिली आहे.
जीवनाला कंटाळलोय, जतजवळ तरुणाची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -