ताजी बातमी ऑनलाईन टीम
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. रश्मिकाच्या साखरपुड्याविषयी आणि लग्नाविषयी विविध अंदाज वर्तवले जातात. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबत अनेकदा तिचं नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता रश्मिकाच्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपची चर्चा होऊ लागली आहे. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. इतकंच नव्हे तर ती कोणत्या अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय, याचाही अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
एका फोटोवरून चर्चांना उधाण
रश्मिकाने नुकतीच तिच्या एका खास मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नातील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यापाठोपाठ तिने आणखी दोन फोटो पोस्ट केले आहेत. या दोन्ही फोटोमागील जागा पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की विजय देवरकोंडासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी विजयनेही त्याच जागेवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. म्हणूनच रश्मिकाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
लग्नाबद्दल विजयची प्रतिक्रिया
‘मी तर कधीपासून म्हणतोय की हे दोघं जवळपास 3-4 वर्षांपासून एकत्र राहतायत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘या दोघांनी साखरपुडासुद्धा केला असेल. यात कितपत सत्य आहे माहीत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयला लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता त्यानेही सकारात्मक उत्तर दिलं. “मला लवकरच लग्न करण्याची गरज आहे. कदाचित ती वेळ जवळ आली आहे. पण सध्या मला त्याबद्दल बोलण्यातही मजा येते. मला लग्नाबद्दल बोलायला आवडतंय. आयुष्यातील हा एक असा टप्पा आहे, जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. पुढील दोन-तीन वर्षांत मी लग्न करेन. अजून तरी मी योग्य मुलीच्या शोधातच आहे”, असं तो म्हणाला होता.
या अभिनेत्यावर जडला ‘नॅशनल क्रश’चा जीव; लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रश्मिका?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -