जगात सध्या कृत्रिम बुद्धिमतेचा (AI Technology) बोलबाला सुरु आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहेत तर या तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत झटपट काम उरकेल. मनुष्यबळ कमी लागेल असे काही दावे करण्यात येत आहे. भारत लवकरच एआय हब होण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आणि टाटा समूहासोबत (Tata Group) त्यांनी सहकार्य कराराची घोषणा केली. शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी याविषयीची माहिती देण्यात आली. या नव्या घडामोडींमुळे देशातील उदयोन्मुख पिढीला मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. तर काहींना हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात मनुष्याचे काम हिसकावून घेईल अशी भीती वाटत आहे.NVIDIA आणणार क्रांती
NVIDIA Inks ही कंपनी भारतात या आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी करणार आहे. त्यासाठी रिलायन्स समूह आणि टाटा समूहाशी हातमिळवणी करण्यात आली आहे. बाजारात चीनला शह देण्यासाठी भारताला विकासाच्या वाटेने जाणे क्रमप्राप्त आहे. चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत आहे. आता एआय तंत्रज्ञानासाठी जमीन कसण्यात येत आहे. रिलायन्स कंपनी त्यांच्या फाऊंडेशन लार्ज लँग्वेज मॉडलसाठी(LLM) काम करत आहे. देशातील विविध भाषांमध्ये सहज संवाद साधता यावा, सहज आणि योग्य भाषांतर व्हावे यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी AI टूल्स आणण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. NVIDIA Inks त्यासाठी खास मदत करणार आहे.सुपर कम्प्युटरला टाकेल मागे
दोन्ही कंपन्या एआय पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर देणार आहे. त्यामाध्यमातून रिलायन्स आणि Nvidia Inks भारतातील सुपर कम्युटरला पण मागे टाकेल. त्यापेक्षा अधिक वेगाने हे तंत्रज्ञान काम करेल. सध्या रिलायन्स AI इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
कंपनीकडे 3800 कर्मचारी
NVIDIA Inks ने 2004 साली भारतात व्यवसाय थाटला. या कंपनीकडे अनेक क्लाएंट आहेत. या कंपनीचे देशात 4 इंजिनिअरिंग सेंटर आहेत. यामध्ये गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे. या सेंटरमध्ये सध्या 3800 कर्मचारी काम करत आहेत.