Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगवडिलांच्या निधनानंतर दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल!

वडिलांच्या निधनानंतर दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल!

गौतमी पाटील हिने ठाण्‍यातील टेंभी नाका येथील दहीहंडीनिमित्त आयाोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या अदाकारीने सर्वांना ठेका धरायला लावले. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम या गाण्यावर तिचा डान्स सुरु होताच तरुणाईने ताल धरला आणि एकच जल्लोष झाला. पण, दुसरीकडे गौतमीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कारण , तिच्या वडिलांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते . आणि दहीहंडी उत्सवात तिने डान्स केला. पण काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेत तिला समर्थन दिले. दहीहंडी उत्सवाला लावणीची सुपारी काही महिने आधी घेतल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळेला सुपारी रद्द करता आली नसती किंवा पैसे परत देता येत नाहीत, असा सूर तिचे समर्थन करणाऱ्या नेटकऱ्यांमधून होता.

 

तिच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. काल दहीहंडीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीनं हजेरी लावली होती. यावेळी गौतमीनं तिच्या डान्सनं सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, दुसरीकडे असे काही नेटकरी आहेत ज्यांना गौतमीचं असे डान्स करणे पटलेलं नाही. अनेकांनी वडिलांच्या निधनानंतर लगेच एका कार्यक्रमात हजेरी लावत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

 

गौतमीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अनेकांना वाटले होते की तिला दहीहंडीनिमित्तानं मिळालेल्या सगळ्या सुपाऱ्या ती रद्द करेल. मात्र, तिनं असं न करता थेट कार्यक्रमात हजेरी लावली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर दुसरीकडे गौतमीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत शेवटच्या क्षणी कोणतीही सुपारी रद्द करता येत नाही असं म्हणतं तिची बाजू घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -