Tuesday, August 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत गौराईचे पारंपारिक पध्दतीने उत्साहात आगमन!

इचलकरंजीत गौराईचे पारंपारिक पध्दतीने उत्साहात आगमन!

वस्त्रनगरी इचलकरंजीत गौराईचे पारंपारिक पध्दतीने उत्साहात आगमन झाले. सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौराई आणि चौथ्या दिवशी शंकरोबाचे आगमन होते. त्यानुसार गुरुवारी गौराईचे आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणले.

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गुरुवारी लक्ष्मीच्या व हळदी- कुंकवाच्या सोनपावलांनी घरोघरी गौरीचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले. इचलकरंजी व परिसरात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात आले. दिवसभर गौराईची प्रतिष्ठाना करण्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू होती. घरोघरी गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली. महिलांनी गौराईस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. यावेळी कुटुंबास सुख, समृध्दी लाभू दे असाही आशीर्वाद सुवासिनींनी मागितला. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे निर्बंध आल्याने महिलांचा उत्साह कमी होता. मात्र आता निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गौराईचे वाजत गाजत धुमधडाक्यात आगमन झाल्याचे पहायला मिळाले.

सकाळी ११ नंतर गौरी नेण्यासाठी मोठे तळे, गणपती हौद, जलशुद्धीकरण केंद्र त्याचबरोबर पाणवठ्याच्या ठिकाणी महिला, युवतींनी पारंपारिक वेशभूषेत हजेरी लावली होती. काहींनी आपल्या परिसरातील गणेश •मंडळापासून गौरी नेल्या. मंडळाच्या ठिकाणीही गौरीगिते ऐकावयास मिळत होती. गौराईच्या आगमनामुळे महिलांच्यात उत्साह दिसत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -