Friday, February 23, 2024
Homenewsजाहिरातीवरुन Alia Bhatt अडचणीत, तिच्याविरोधात FIR दाखल!

जाहिरातीवरुन Alia Bhatt अडचणीत, तिच्याविरोधात FIR दाखल!


बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भटच्या (Actress Alia Bhatt) अडचणीत वाढ झाली आहे. अलिकडेच आलिया भटने एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीमुळे ती अडचणीत आली आहे. आलियाच्या ‘कन्यादान’ या जाहिरातीवरुन (kanyadaan advertising) वाद निर्माण झाला असून याप्रकरणी तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल (fir filed against alia bhatt) करण्यात आली आहे. तक्रारकर्ता ब्राइडल वेअर ब्रँडच्या (Bridal wear brand) नवीन जाहिरातीविरोधात आहे. तक्रारदाराला असे वाटते की, ‘आलिया भटने हिंदूच्या (hindu) भावना दुखावल्या आहेत आणि कन्यादान प्रतिगामी पद्धतीने दाखवले आहे.’ या जाहिरातप्रकरणी या व्यक्तीने मान्यवर कंपनी (Manyavar Company) आणि आलिया भट यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे

काय आहे हे प्रकरण ?
कन्यादानच्या या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे की, आलिया भट वधूच्या (Alia Bhatt in Bridal Look) रुपात म्हणजेच सुंदर असा लाल रंगाचा लेहंगा घालून लग्नमंडपामध्ये बसलेली आहे. ती आपली माहेरची आठवण काढत भावनिक होत असते. यावेळी आपले आई-वडील (Mother-Father) आणि आपल्या संगोपणाबद्दल बोलताना आलिया भट कन्यादान या परंपरेवर सवाल उपस्थित करते. हे लोकांना अजिबात आवडत नाही.

कंगना राणावतने केलीये टीका –
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत (Bollywood Actress Kangana Ranaut) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असते. आलिया प्रत्येक गोष्टींवर आपले मत मांडायची एकही संधी सोडत नाही. अशामध्ये तिने आलिया भटच्या कन्यादान या जाहिरातीवर देखील टीका केली आहे. तिने असे म्हटले होते की, ‘सर्व ब्रँडना विनंती आहे की गोष्टी विकण्यासाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्य राजकारणाचा (Religion, minority, majority politics) वापर करु नका. या हुशारीने जाहिरातींद्वारे लोकांना विभागून ग्राहकांना मेनुपुलेट करु नका.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -