Monday, August 25, 2025
Homeसांगलीसांगली : अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त; तिघाजणांवर गुन्हा दाखल

सांगली : अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त; तिघाजणांवर गुन्हा दाखल

 

 

पांढरेवाडी (ता. जत) येथे नदीपात्रातून अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा ५ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई शनिवारी (दि. ३०) उमदी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी मल्हारी करपे, प्रकाश करपे (दोघे रा. पांढरेवाडी) व सुरेश कोळी, रा. संख असे तिघा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, उमदी पोलीस ठाणे हद्दीतील संख दुरुक्षेत्र कार्यक्षेत्रात असलेल्या पांढरेवाडी येथील नदीपात्रातून अवैधरित्या चोरीने वाळू उपसा करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी या ठिकाणी छापा टाकून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पोहेका कपील काळेल,आप्पासाहेब हाक्के, पो.का चौगूले, पोका सुदर्शन खोत यांनी केली आहे. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -