व्हॉट्सअॅपवर ठेवलेलं स्टेटस हे 24 तासांमध्ये गायब होतं. त्यामुळे एखादी गोष्ट अधिक काळ स्टेटसवर ठेवायची असेल, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्टेटसला ठेवणं हाच पर्याय असतो. मात्र, आता ही अडचण लवकरच दूर होणार आहे.फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. काही दिवसांमध्ये कदाचित सर्व यूजर्सना हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत अधिकृत माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी दिवसेंदिवस नवीन अपडेट आणत आहे. काही दिवसांपूर्वीच चॅनल्स फीचर लाँच केल्यानंतर, मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅपमध्ये एआय स्टिकर्स आणि चॅटबॉट देखील देण्याची घोषणा केली आहे.