Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 40 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : 40 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पोलिसांचा आदेश धुडकावून विनापरवाना मिरवणूक काढणे, वाहतुकीला अडथळा करणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, आवाज मर्यादेचे उल्लंघन करणे, घातक लेसर किरणांचा वापर करणे आदी कारणामुळे जुना बुधवार पेठ तालमीच्या कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, उदय भोसले यांच्यासह 40 ते 50 जणांचा यात समावेश आहे.


अनंत चतुर्दशीलाच मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आवश्यक होते. मात्र, जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने पोलिसांचा आदेश धुडकावून शनिवारी शहरातून मिरवणूक काढत मूर्तीचे विसर्जन केले. मिरवणुकीची परवानगी घेतली नाही. वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा केला. याबाबत जाब विचारणार्‍या पोलिसांशी कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर, लेसर किरणांचा वापर आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी ध्वनियंत्रणा लावल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंडळाचे दहा पदाधिकारी, ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह मंडळाचे समर्थक आणि अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला.


यामध्ये मंडळाचे पदाधिकारी केदार सुकुमार शिंदे, अक्षय संजय घाटगे, कल्पेश कृष्णात नाळे, जयशंकर धर्मेश नष्टे, तेजस ज्ञानेश्वर मोहिते, अजित मोहन मंडलिक, विनित सुजित पाटील, ललित निशिकांत कराळ, प्रथमेश विजय लिमये, अमेय राकेश कांबळे (सर्व रा. जुना बुधवार पेठ), अनोळखी दोन ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक सुतार बंधू, ध्वनियंत्रणेचे मालक सागर गवळी (रा. मंगळवार पेठ) यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -