फेसबुकने भारतात सर्वात मोठा ‘क्रिएटर एज्युकेशन ऍंड इनेबलमेंट’ प्रोग्राम लॉंच केला आहे. यामाध्यमातून कंटेंट क्रिएटर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शिकणे आणि पैसे कमावण्यासोबतच आपला जनसंपर्क देखील वाढवू शकतील. ‘क्रिएटर डे इंडिया’ 2021 आवृत्तीमध्ये गुरूवारी इंस्टाग्राम हेड एडम मोसेरीने म्हटले की, भारत फोटो शेअरिंग आणि शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर सर्वात तेजीने वाढणाऱ्या मार्केटपैकी एक आहे.
फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय निर्देशक अजित मोहन यांनी म्हटले की, भारतात मागील एका वर्षात टॅलेंट आणि क्रिएटीव्हिटीचा अविष्कार पाहायला मिळाला आहे. आम्ही या इकोसिस्टिममध्ये गुंतवणूक आणि सपोर्ट करू इच्छितो. आम्ही क्रिएटीव्ह टूल्सची एक रेंज डेवलप करण्याचा प्रयत्न करण्याचे नियोजन करीत आहोत. रिल्स (Reels) याचे एक उत्तम उदाहरण आहे. देशातील लहान शहरातील आणि निम शहरी भागातील नेटकरी शॉर्ट व्हिडिओ फीचर्सचा मोठ्या कमालीने वापर करीत आहे. आज भारतात दररोज 60 लाख रिल्सची निर्मिती केली जात आहे. तसेच अजित मोहन यांनी पुढे म्हटले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मॉनिटाइजेशन टुल्स सादर करीत आहे. हा टुल्स क्रिएटर्सला कंटेंटच्या माध्यमातून कमाई करून देण्याची संधी आहे.
सर्वात मोठा क्रिएटर लर्निंग प्रोग्राम
अजित मोहन यांनी म्हटले की, क्रिएटर जर्नीमध्ये शिकणे ही एक महत्वाची फेज आहे. लर्निंगचे आधीपेक्षा जास्त विकेंद्रीकरण करण्यासाठी आम्ही सर्वात मोठा क्रिएटर लर्निंग प्रोग्राम सुरू करीत आहोत. हा ‘बॉर्न ऑन इंस्टाग्राम’चा पुढील टप्पा आहे. बॉर्न ऑन इंस्टाग्राम प्रोग्राम 2019 साली सुरू करण्यात आला होता.
फेसबुक वापरा पैसा कमवा; भारतात लॉंच झाले शानदार फीचर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -