Monday, March 4, 2024
Homenewsशाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालये सुरु होणार दिवळीनंतर !

शाळांपाठोपाठ राज्यातील महाविद्यालये सुरु होणार दिवळीनंतर !


शाळांपाठोपाठ (School) राज्यातील महाविद्यालये (College) देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर (Diwali 2021) महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (maharashtra minister uday samant) यांनी दिली. ‘राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकली जात आहेत. 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाला (academic year) सुरुवात होणार असली तरी सुद्धा दिवाळीनंतरच प्रत्यक्ष महाविद्यालये सुरु होतील अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि कोविड टास्क फोर्ससोबत (covid Task Force) झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे उदय सामंत यांनी सांगितले

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत अकृषी विद्यापीठांच्या (non-agricultural universities) कुलगुरुंची (Vice-Chancellor) बैठक झाली. राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याच्या मन:स्थितीत आहोत. 1 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु करावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले आहे. पण याच कालावाधीत दिवाळी असल्याने शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी सणानंतरच (Festival) महाविद्यालये सुरु करता येतील. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढवा घेऊनच महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, ‘विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अजूनही कोविडची (Covid – 19) भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपस्थितीची सक्ती केली जाणार नाही. त्यासोबतच हमीपत्राचीही आवश्यकता नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल. राज्यात कोरोनाची (Corona Virus) स्थिती कमी होत चालली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्याठिकाणी महाविद्यालये सुरु करायला हरकत नाही. पण याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -