Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यविषयकडॉक्टर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता!

डॉक्टर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता!


निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने (MARD) आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप (resident doctors on strike) पुकारला आहे. शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देखील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने याबाबत अजूनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संपाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. या संपात राज्यातील 5 हजारांहून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले आहेत त्यामुळे याचा रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णसेवेवर (medical system) परिणाम होणार नाही याचे आश्वासन डॉक्टरांकडून देण्यात आले आहे. संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या (Directorate of Medical Research ) संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात (St. George’s Hospital) गुरुवारी रात्री उशीरापर्यत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरेल असेही मार्डने सांगितले होते पण, त्यात ही तोडगा निघाला नाही. परिणामी अशा परिस्थितीमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवासी डॉक्टर (resident doctors) जवळपास दीड वर्षांपासून कोरोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh) यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर मार्ड संघटनेने शुक्रवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -