Saturday, July 27, 2024
HomenewsTCS, Wipro, Infosys सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे 'Work From Home' केले बंद!

TCS, Wipro, Infosys सह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे ‘Work From Home’ केले बंद!


देशावर असलेले कोरोनाचे (Coronavirus) संकट हळूहळू ओसरत चालले आहे. कोरोनाचा (Covid-19) वेग मंदावला असून रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. त्यामुळे सरकारने एकापाठोपाठ अनेक निर्बंधामध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये देशातील मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण (Vaccination) देखील पूर्ण झाले आहे. सरकारकडून (Government Of India) लसीकरणावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉर्पोरेट कंपन्यांनी (Corporate Copanies) आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना काळामध्ये कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) दिले होते. पण आता वर्क फ्रॉम होम बंद करुन पुन्हा कर्मचाऱ्यांना ऑफिसला (office) बोलवण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे.

टीसीएस, विप्रो, इन्फोसिस यासारख्या आयटी कंपन्यांसह बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील (Banking And Finance Companies) अनेक कंपन्यांनीसुद्धा वर्फ फ्रॉम होम बंद करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. देशातील कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) वर्षाअखेरपर्यंत त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्याची योजना आखत आहे. कोटक महिंद्रांनी हे स्पष्ट केले आहे की, कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याची बँकेची योजना आहे. यासोबत एचडीएफसी बँक (HDFC BAnk), एक्सिस बँक (Axis Bank) आणि येस बँक (YES Bank) पुढच्या काही महिन्यात 90 टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस सुरु करण्याची तयारी करत आहे

तर, विप्रो कंपनीचे कर्मचारी ज्यांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन डोस घेतले आहेत ते सर्व उच्च पदावरील अधिकारी आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि गुरुवारी काम करत आहे. तर टीसीएस कपंनी (TCS Company) त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना 2022 च्या सुरुवातीपर्यंत ऑफिसमध्ये परत बोलवण्याच्या तयारीत आहे. पण कंपनीने अशी घोषणा केली होती की, 2025 पर्यंत 25 टक्के कर्माचाऱ्यांना 25X25 मॉडेल अंतर्गत घरातून काम करण्यासाठी परवानगी दिली जाईल. विप्रो (Wipro), इन्फोसिस (Infosys) यासारख्या आयटी कंपन्यांमध्ये हाच मार्ग अवलंबला जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी ऑफिसला जाण्यासाठी तयारी दर्शवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -