शेतकऱ्यांना खूश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.केवायसी करणे बंधनकारक आहे.
पैसे खात्यात कसे येणार?
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आता मिळणारा हा हप्ता कोणता?
या योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
खंडकरी पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना (farmer) एक एकरापेक्षा कमी जमीन वाटप करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. माजी खंडकरी शेतकऱ्यांकडून सातत्याने ही मागणी होत होती.
राज्य सरकारने दिली शेतकऱ्यांना खूश करणारी बातमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -