दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडीत घडली आहे.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली. करोली टी येथील राजेंद्र चव्हाण आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांना त्यांचे धुणे दिसले, मात्र जवळपास कोणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. सांगलीच्या भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम रेस्क्यू टीमचे, गजानन नरळे, एच ईआर एफ महेश कुमारमठ, फिरोज शेख, अनिलकोळी, योगेश मेंढीगिरी, सय्यद राजेवाले, नीलेश शिंदे यांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिस कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. . ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे.