Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगअरबी समुद्रात घोंघावतंय 'तेज' चक्रीवादळ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अरबी समुद्रात घोंघावतंय ‘तेज’ चक्रीवादळ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रिवादळात रुपांतर झाल्यास त्यास ‘तेज’ नावानं ओळखलं जाईल.

 

कमी दाबाचा पट्टा अद्याप इतका शक्तीशाली झालेला नाही की त्यास चक्रवादळाचा दर्जा देता येईल. पण पुढचे ४८ तास महत्वाचे मानले जात आहेत.

 

पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रिवादळात रुपांतर होऊ शकते. जर चक्रीवादळ ‘तेज’ तयार झाले तर ते किनारपट्टीवरुन गुजरातच्या दिशेनं सरकू शकते. भारतीय हवामान खातं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळाने मुंबईत तरी वादळी पाऊस येण्याची शक्यता नसली तरी काही भागातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, पुणे या भागांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -