Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत ऑनलाईन जुगार सेंटरवर छापा

इचलकरंजीत ऑनलाईन जुगार सेंटरवर छापा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील राजर्षी लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन जुगार सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या वीस जणांसह लॉटरी सेंटर चालक संजय बाळासाहेब किणेकर (रा. श्रीपादनगर, इचलकरंजी ) यांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रोख रक्कमेसह ९ मोबाईल हॅण्डसेट, एक संगणक संच असा हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी रात्री केली.



अटक केलेल्याच्या मध्ये लॉटरी सेंटर चालक संजय किणेकर ( रा.श्रीपादनगर, इचलकरंजी), बापू राजू सपाटे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी), शितल आदीनाथ तारदाळे (रा. टाकवडे वेस, गावभाग, इचलकरंजी), पवन शिवाजी पाटील (रा. सावित्रीनगर, शहापूर), राजू कुमार पाटील (रा.कलानगर, इचलकरंजी ), अजित बाळकृष्ण कुलकर्णी (रा. वेताळ पेठ, इचलकरंजी), हरी महादेव खोत ( रा. भोने माळ, इचलकरंजी ), मनोज वर्धमान भूत्ते ( रा. कलानगर), मुजम्मिल मजीद अन्सारी ( रा. लक्ष्मी माळ, रुई फाटा), रोशन उर्फ सागर धरमचंद जैन उर्फ बोहरा ( रा. चादणी चौक, इचलकरंजी), सोहेल जावेद मोमीन ( रा.मुरदुंडे मळा, इचलकरंजी ), रियाज फिरोज मुल्ला (रा. सुतार मळा, इचलकरंजी ), संभाजी विष्णू सुतार (रा. सहकारनगर, साईट नंबर १०२, इचलकरंजी), मल्लिकार्जुन जगदेव सपली (रा.बंडगर माळ, इचलकरंजी), संतोष रामचंद्र खेडकर ( रा.जवाहरनगर, इचलकरंजी ) सुरेश व्यंकाप्पा वडर (रा. माणगाव ), सागर आप्पासो मधाळे (रा. बोरगाव, ता. निपाणी), आनंदा आळंदे (रा. ईदगा मैदान, नमाजे मळा, इचलकरंजी ) यांचा २१ जणाचा समावेश आहे.

(रा.बडगर माळ, इचलकरजा ), सताष रामचंद्र खडकर (
रा.जवाहरनगर, इचलकरंजी ) सुरेश व्यंकाप्पा वडर (रा. माणगाव ), सागर आप्पासो मधाळे (रा. बोरगाव, ता. निपाणी), आनंदा आळंदे (रा. ईदगा मैदान, नमाजे मळा, इचलकरंजी ) यांचा २१ जणाचा समावेश आहे.
मध्यवर्ती बसस्थानका समोरील भाड्याच्या दुकान गाळ्यात ऑनलाईन राजर्षी लॉटरी सेंटरमध्ये अवैधपणे ऑनलाईन जुगार रासरोसपणे खेळला जात होता. यांची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांना सांगून, या बेकायदेशिर ऑनलाईन राजर्षी लॉटरी सेंटर कारवाई करण्याबाबतचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कॉन्स्टेबल सतीश कुंभार, अरविंद माने, अमित कांबळे, किशोर माळी आणि होमगार्ड आदीच्या पथकाने या ऑनलाईन जुगार सेंटरवर गुरुवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी या ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळणारे २० जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेत या ऑनलाईन लॉटरीमधून रोख रक्कमेसह ९ मोबाईल हॅण्डसेट, एक संगणक संच असा हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या बाबतचा शिवाजीनगर पोलीसात गुन्हा नोद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -