एक दोन दिवसात बैठक होऊ द्या, वेळ पडल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हाबंदी करू, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने फसवले आहे असा आरोप करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने फसवे सरकार चले जावं आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोल्हापुरी चप्पल दाखवले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील मराठा समाजाला फसवलेलं आहे. मात्र इथून पुढे मराठा समाज फसणार नाही… चार दिवसात बैठक घेऊ आणि वेळ पडली तर पालकमंत्र्यांना देखील जिल्हा बंदी करू, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला आहे. आज कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फसवे सरकार चले जाव अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोल्हापुरी चप्पल देखील दाखवले आहे.
मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधण्यात आल्या तर महिलांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे कोल्हापुरातील मराठा समाज देखील आता आक्रमक झाला असून थेट नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील मराठा समाजाला फसवले आहे. अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.