ताजी बातमी ऑनलाईन टीम
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी गावभागातील पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांना निवेदन देण्यात आले.
सध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटर आहे. ती ५२४.२५६ मीटर इतकी करण्याचा कर्नाटक सरकारच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. धरणाची उंची
वाढली तर पाण्याचा फुगवटा येऊन पुन्हा एकदा २०१९ व २०२१ सारख्या महापुरांचा वेढा येऊन इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसून बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिक,शेतकरी, कारखानदार, उद्योजक यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी
धरणाच्या उंची वाढीस विरोध करावा व धरणाची उंची वाढू नये यासाठी गावभागातील पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने निवेदन दिले.
यावेळी आ. आवाडे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून धरणाची उंची वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे अश्वासन दिले. शिष्टमंडळात शिवाजी साळुंखे, संजय जगताप, डॉ. प्रकाश पाटील,
किरण लंगोटे, राहुल सूर्यवंशी, अमोल जाधव, राहुल जगताप
आदींचा समावेश होता.
इचलकरंजी ; अलमट्टीची उंची वाढवू नये गावभागातील पूरग्रस्त नागरिकांचे आ. आवाडेंना निवेदन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -