मेरी माटी मेरा देश’अंतर्गत जिल्ह्यातून १५ अमृत कलश दिल्लीला रवाना झाले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांनी कलश घेऊन जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवला. हे कलश मुंबईमार्गे दिल्लीला पाठविले जातील. जिल्ह्यातील १२ तालुके, पालिका १ आणि महापालिका २ असे एकूण १५ कलश संकलित केले. राज्यातील कलश मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्रीत आणले जाणार आहेत. शुक्रवारी (ता. २७) त्यांचे पूजन केले जाईल. दिल्लीला ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार आहे. दिल्लीत वीरांच्या स्मरणार्थ कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत वाटीकेत ही माती अर्पण केली जाणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति. आयुक्त केशव जाधव, जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी पूजा सैनी, ३० स्वयंसेवक व समन्वयक उपस्थित होते.