Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरउसन्या पैशांवरून राष्ट्रीय नेमबाजाचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न, वाद सोडवण्यासाठी आलेल्या 6...

उसन्या पैशांवरून राष्ट्रीय नेमबाजाचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न, वाद सोडवण्यासाठी आलेल्या 6 जणांवर हल्ला

 

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून येथील दुधाळी येथील कुसाळे यांच्या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय नेमबाजाचा (National Shooter) केबलने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी झालेला वाद सोडविण्यासाठी आलेल्या चौघांनाही बेदम मारहाण करून रापीने वार केल्याप्रकरणी निपाणी येथील एकावर खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.इम्तियाज गुलाब मुजावर (वय ४७, रा. जुने मोटार स्टॅण्ड, निपाणी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीनवरही गुन्हा नोंद झाला आहे. दुधाळी येथील नेमबाज प्रशिक्षण केंद्र आणि पाडळकर मार्केट परिसरात ही थरारक घटना घडलीदरम्यान, इम्तियाज मुजावर यानेही विरोधी फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये समर्थ मंडलिक, त्याचे वडील रणजित मंडलिक याच्यासह २५ जणांविरोधात गर्दी, मारामारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक्षण केंद्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांतील आर्थिक देवाणघेवाणीतून हा हल्ला झाल्याची लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय नेमबाज जखमी समर्थ रणजित मंडलिक (वय १९, रा. लाड चौक, नाथागोळे तालीम मंडळ, शिवाजी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुसाळे यांच्या नेमबाज केंद्रात संशयित इम्तियाज मुजावर काल दुपारी तीनच्या सुमारास आला व त्याने शिवीगाळ सुरू केली. यावेळी मुजावर याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काळ्या रंगाच्या केबलने समर्थ मंडलिक याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.जखमी अवस्थेतच सीपीआरमध्ये केले दाखलसमर्थ मंडलिक यांनी उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास हा वाद सुरू झाला. येथे इम्तियाज मुजावरने मंडलिकला मारहाण केली. ही माहिती त्याचे वडील रणजित मंडलिक यांना कळताच तेही काही मित्रांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इम्तियाजने तिथून पळ काढला. तो पाडळकर मार्केटजवळ आल्यानंतर त्याला जमावाने बेदम मारहाण केली त्यात तो रक्ताने माखला. पोलिसांनी जखमी अवस्थेतच इम्तियाजला सीपीआरमध्ये दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -