Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात पार्कीनसन रूग्ण मदत केंद्र, रुग्णांना ७० टक्क्यापर्यंत लाभ

कोल्हापुरात पार्कीनसन रूग्ण मदत केंद्र, रुग्णांना ७० टक्क्यापर्यंत लाभ

 

रोटरी क्लब ऑॅफ कोल्हापूर रोटरी समाज सेवा केंद्रातर्फे पार्किन्सन डिसीज मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून रोटरी पार्किन्सन पूनर्वसन केंद्र कोल्हापूरात सुरू झाला आहे. येथे मोफत व्यायाम प्रशिक्षणाची सेवा मोफत मिळत असून त्याचा पार्किन्सन (कंपवात) रूग्णांनी लाभ घेता येईल, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष अरूणकुमार गोयंका यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.गोयंका म्हणाले, ‘‘पार्किन्सन आजारी रूग्णांना विविध पातळ्यांवर त्रास कमी व्हावा यासाठी पार्किन्सन डिसीज मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी मुंबई देशभरातील ६० केंद्र सुरू केली आहेत. यातील एक केंद्र कोल्हापूरात सुरू झाले आहे. त्याचा लाभ स्थानिक रूग्णांना घेता येणार आहे. पार्किन्सन आजारात हातांची थरथर, पायांचा डगमळीतपणा वाढता. शरिराची अनियंत्रीत हालचाल, स्नायूमधील कडकपणा, बोलण्यात कंप, अस्पष्ठ बोलणे, नैराश्य, चेहऱ्यांवर भावना न दिसणे, शरिर पुढे झुकणे, आदी लक्षणे दिसून येतात. अशा रूग्णांना या मदत केंद्रातून भौतिक चिकित्सा, वाचा चिकित्सा, नृत्य, समुपदेशन, आहार, योगासन, जापनीज थेरपि, यासह व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी मुंबईतील तज्ञ मेंदू विकार तज्ञांच्या सल्ल्याने स्थानिक डॉक्टर व फिजीओ थेरपिस्ट यांचे मार्गदर्शनाखाली या चिकित्सा व व्यायाम सांगितले जातात. या केंद्रात सध्या ५० ते ६० पार्किन्सनचे रूग्ण मार्गदर्शन घेत आहेत. यापुढेही नवीन रूग्णांसाठी या केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. हे केंद्र माधव गोयंका भवन, महावीर उद्याना शेजारी नागाळा पार्क येथे हे केंद्र आहे.’’ या वळी रोटरी समाज सेवा केंद्राचे सुभाष मालू, सिध्दार्थ पाटणकर, प्रदीप पासमल, अमित मोटे, डॉ. दिलीप शहा, श्यामसुंदर तोतला आदी उपस्थित होते. रुग्णांना ७० टक्क्यापर्यंत लाभपार्किन्सन आजारातील रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे व फिजोथेरपी किंवा व्यायाम घेतल्यास त्याचा ७० टक्क्यापर्यंत चांगला लाभ दिसून येत आहे, रूग्णांच्या अनेक लक्षणांची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे याकेंद्रात नियमीतपणे व्यायाम, समुपदेशन घेण्यासाठी अनेक रूग्ण येतात, असे डॉ. जानव्ही ठाकुर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -