Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरमराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा; कोल्हापूरमधून मागणी

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा; कोल्हापूरमधून मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा; कोल्हापूरमधून मागण

कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. यावेळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अजूनही मनोज जरांगे यांची भेट घेतली नाही, असं आंदोलकांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांना वारंवार भेटणारे गिरीश महाजन कोण? अमराठा नेत्यांना चर्चेसाठी पाठवून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न असल्याचं देखील आंदोलकांनी सांगितले. तसेच

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यातआली.

दरम्यान, आहे. या साखळी उपोषणामध्ये आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आपला पाठिंबा आहे. तसचं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावं अशी मागणी आपण उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच आज पासून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -